Breaking News

‘पोलीस पाटील यांनी सतर्क राहावे’

मोहोपाडा : प्रतिनिधी

सुरू झालेल्या पावसाळ्यात होणारी नैसर्गिक आपत्तीत गावातील पोलीस पाटील यांनी सतर्क राहून जनतेची काळजी घ्यावी, पोलीस दल आपल्याला सर्व प्रकारची मदत करेल, असे आश्वासन खालापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल विभुते यांनी दिले. रविवारी

(दि. 19) खालापूर पोलीस ठाणे हद्दीतील गाव पोलीस पाटील यांची बैठक नेताजी पालकर सभागृहात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

मान्सून कालावधीत करावयाचे उपाययोजना, नदी, धरणे धबधबे, तलाव या ठिकाणी होणारे अपघात, तसेच येणारे पर्यटक यांना विशेष सूचना देण्याबाबत व धोकादायक ठिकाणी फलक लावण्यात यावे, आपत्तीकालीन व्यवस्थापन तसेच स्थानिक पातळीवर उपलब्ध होणारी साधनसामुग्रीचा वापर कशाप्रकारे करता येईल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यासोबतच सायबर क्राईम, आगामी सण-उत्सव (बकरी ईद व आषाढी एकादशी) निमित्ताने गावात शांतता प्रस्थापित करणे, एकत्रित येऊन सणवार साजरे करणे, जातीय व धर्मांध सलोखा बिघडू नये यासाठी प्रयत्न करणे, गावात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे व त्याबाबत जनजागृती करणे, गावातील एकाकी राहणारे ज्येष्ठ नागरिक यांची काळजी घेणे या बाबत योग्य त्या सूचना दिल्या व मार्गदर्शन केले.

या वेळी पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष अनंत ठोंबरे पाटील यांच्यासह गाव पोलीस पाटील हजर होते.

Check Also

Have you been on the e, utilizing the thrill off a genuine gambling enterprise sense?

Finest Crazy Go out Gambling establishment Web sites elizabeth Online Uk Do you really discover …

Leave a Reply