Breaking News

मुंबई विभागात रायगड अव्वल; रायगडचा बारावीचा निकाल 93.11 टक्के

अलिबाग : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (दि. 8) जाहीर करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील 93.11 टक्के विद्यार्थी उर्तीर्ण झाले. गेल्या वर्षी जिल्ह्यात 99.81 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. असे असले तरी  यंदा रायगडने मुबई विभागात अव्वल स्थान मिळवले आहे. मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेसाठी रायगड जिल्ह्यात 31 हजार 335 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी 31 हजार 106 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. त्यातील 28 हजार 964 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होण्यात यंदाही मुलींनी बाजी मारली. जिल्ह्यातील 91.65 टक्के मुले तर 94.72 टक्के मुली बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील 14 हजार 788 मुली परीक्षेला बसल्या होत्या, त्यातील 14 हजार 08 मुली उत्तीर्ण झाल्या. म्हणजेच 94.72  टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. 16  हजार 318 मुले बारावीच्या परीक्षेला बसली होती. त्यातील 14  हजार 956 मुले उत्तीर्ण झाली. म्हणजेच 91.65 टक्के मुले उतीर्ण झाली. रायगडचा विज्ञान शाखेचा निकाल 97.81 टक्के, कला शाखेचा निकाल 85.06 टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल 93.41 टक्के तर किमान कौशल्य शाखेचा निकाल 92.56 टक्के लागला. सुधागड तालुक्याचा निकाल सर्वाधिक लागला. त्या तालुक्यातील 98.21  टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर पोलादपूर तालुक्याचा सर्वात कमी निकाल लागला आहे. तेथील 71.85 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

तालुकानिहाय टक्केवारी

पनवेल     97.47 टक्के,

उरण 92.59 टक्के,

कर्जत      90.22 टक्के,

खालापूर    77.74 टक्के,

सुधागड    98.21 टक्के,

पेण 94.47 टक्के,

अलिबाग    96.53 टक्के,

मुरूड      74.56 टक्के,

रोहा 91.70 टक्के,

माणगांव    95.09 टक्के,

तळा 95.33 टक्के,

श्रीवर्धन    95.41 टक्के,

म्हसळा    98.10 टक्के,

महाड      90.87 टक्के,

पोलादपूरचा निकाल 71.85 टक्के.

 

मुंबई विभागाचा निकाल

ठाणे       92.67

रायगड     93.11

पालघर     91.77

मुंबई शहर-  86.60

मुबई उपनगर (1)-  89.33

मुंबई उपनगर(2)- 91.00

एकूण – 90.91

 

कर्जत तालुक्याचा बारावीचा निकाल 90 टक्के अनेक कनिष्ठ महाविद्यालयांनी मिळविले धवल यश

कर्जत : बातमीदार

मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (दि. 8) जाहीर करण्यात आला. त्यात कर्जत तालुक्याचा निकाल 90.22 टक्के इतका लागला आहे. तालुक्यातील सहा कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.  कर्जत तालुक्यात 15 कनिष्ठ महाविद्यालये आहेत.  तालुक्यातील 2303 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा देण्यासाठी अर्ज भरले होते, त्यातील 11 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नव्हती. उर्वरित 2292 पैकी 2068 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कर्जत तालुक्याचा बारावी परीक्षेचा निकाल 90.22 टक्के लागला आहे. कर्जत तालुक्यातील भाऊसाहेब राऊत कनिष्ठ विद्यालय (चिंचवली-डिकसळ), हुतात्मा हिराजी पाटील कनिष्ठ महाविद्यालय (कडाव), शासकीय आश्रमशाळा (पाथरज, चाफेवाडी, भालिवडी) तसेच माध्यमिक विद्यालय-कनिष्ठ महाविद्यालय (गौळवाडी), हाजी लियाकत कनिष्ठ महाविद्यालय, फईम इंग्लिश मीडियम स्कूल कनिष्ठ महाविद्यालय या कनिष्ठ महाविद्यालयांचे निकाल 100 टक्के लागले आहेत. तर नेरळ विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा, ऑर्चिड कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान आणि कला शाखेचा तसेच भाऊसाहबे राऊत (कशेळे)येथील विद्यालयाच्या कला शाखेचा, भालिवडी आश्रमशाळेच्या विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला आहे.

असा आहे सविस्तर निकाल : अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला विज्ञान शाखा 126, कला 92, वाणिज्य 389, नेरळ विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान शाखा 126, कला 147, वाणिज्य 283, श्रमजीवी विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय कला शाखा 93, भाऊसाहेब राऊत विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय कशेळे कला शाखा 78, वाणिज्य शाखा 92, गौळवाडी माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय कला शाखा 33, वाणिज्य शाखा 33, भाऊसाहेब राऊत चिंचवली डिकसळ कला शाखा 37, वाणिज्य शाखा 30, नम्रता आचार्य कनिष्ठ महाविद्यालय शेलू कला शाखा 35, वाणिज्य शाखा 29, हुतात्मा हिराजी पाटील कनिष्ठ महाविद्यालय कडाव विज्ञान शाखा 14, कला शाखा 26, वाणिज्य शाखा 25, हाजी अली इंग्लिश मिडीयम स्कूल, नेरळ विज्ञान शाखा 18, कला 13, वाणिज्य शाखा 31, ऑर्चिड कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान 21, कला शाखा 4, वाणिज्य शाखा 16, फईम कनिष्ठ महाविद्यालय दामत कला शाखा 5, वाणिज्य 2, शासकीय आश्रमशाळा पाथरज कला शाखा 61, शासकीय आश्रमशाळा भालिवडी विज्ञान शाखा 13, कला शाखा 34, शासकीय आश्रमशाळा पिंगळस चाफेवाडी विज्ञान शाखा 17, कला शाखा 44, व्होकेशनल स्कुल कर्जत अभिनव प्रशाला केंद्र 34 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply