Breaking News

चांभारखिंड ग्रामपंचायतीवर फडकला भाजपचा झेंडा

 सरपंचपदी मंगेश पालकर यांची बिनविरोध निवड

महाड : प्रतिनिधी

तालुक्यात महत्त्वाची समजल्या जाणार्‍या चांभारखिंड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपचे मंगेश पालकर यांची बिनविरोध निवड झाली. भाजपच्या वरिष्ठांनी पालकर यांचे अभिनंदन केले.

धोंडू पालकर यांनी राजीनामा दिल्यामुळे चांभारखिंड ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त झाले होते. दरम्यान, राज्य सरकारने थेट सरपंच निवडीचा निर्णय बदलल्याने पुन्हा एकदा सदस्यामधून सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला.

नऊ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीचे सदस्य रामदास पारावे यांनी राजीनामा दिल्यामुळे प्रथम या रिक्त सदस्यपदासाठी निवडणूक घेण्यात आली. या वेळी भाजपचे मंगेश पालकर यांची सदस्य म्हणून बिनविरोध झाली. 13 जून रोजी झालेल्या निवडणुकीत मंगेश पालकर यांची सरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.

चांभारखिंड ग्रामपंचायतीत भाजपचा सरपंच निवडून आणन्यात पक्षाचे जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर व तालुकाध्यक्ष जयवंत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे विभाग अध्यक्ष सुहास कुडपाने यांनी विशेष मेहनत घेतली.

दरम्यान, पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगेश पालकर व सुहास कुडपाने यांचे विशेष अभिनंदन व सत्कार केला.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply