Breaking News

आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी रसायनीत सायबर साक्षर अभियान

मोहोपाडा : प्रतिनिधी

रायगड पोलीस अधीक्षक कार्यालय, रसायनी पोलीस ठाणे व ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेच्या वतीने कांबे गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरात सायबर साक्षर अभियान राबविण्यात आले. या वेळी कांबे गावासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

कांबे येथील हभप बाळाराम महाराज कांबेकर, रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे, ऑल इंडिया पोलिस जनसेवा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव गणेश थोरवे आदींच्या हस्ते मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर साक्षर सायबर अभियानाला सुरुवात करण्यात आली. ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना यांच्यावतीने आभारप्रदर्शनाचा कार्यक्रम झाल्यानंतर मान्यवरांचे आभार मानण्यात आले.

पोलीस उपनिरीक्षक धनाजी काळे यांनी सायबर साक्षर सुरक्षित कांबे गाव अभियानियावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी पोलिस उपनिरीक्षक धनाजी काळे म्हणाले की, कमी कालावधीत पैसे दुप्पट करण्याच्या कोणत्याही योजनेमध्ये गुंतवणूक करू नये, कोणत्याही साखळी योजनेत, मल्टीलेवल मार्केटिंग योजनेत पैशाची गुंतवणूक करू नये, सायबर क्राईम फिशींग व्यवहारात आपले बॅक खाते बंद पडले आहे, असे सांगून आपल्या एटीएमचा पिन कोड नंबर घेऊन खाते हॅक केले जाते, या वेळी आपण माहिती दिल्यानंतर आपल्याला मेसेज येतो. यासाठी कोणालाही आपला ओटीपी नंबर देवू नये, नवीन गृहप्रकल्पाची जमीन बिनशेती असल्याची खात्री झाल्यावरच पुढील कार्यवाही करावी, नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक टाळावी, आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी आपणच आपली खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे पोलीस उपनिरीक्षक धनाजी काळे यांनी बोलताना सांगितले.

रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांनी कोरोना संसर्गापासून आपणच आपल्या सुरक्षिततेसाठी सोशल डिस्टंस राखून मास्क व सॅनिटायझरचा वापर करून सावधानता बाळगावी, असे आवाहन केले.

या वेळी पोलीस नाईक विशाल झावरे, मंगेश लांगी, महिला व हभप बाळाराम महाराज कांबेकर, हभप सच्चिदानंद महाराज गोंधळी, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गायकवाड, माजी उपसरपंच दत्तात्रेय जांभळे, डॉ. संजय कुरंगळे, नंदू कुरंगळे, दिप्ती म्हात्रे, निखिल डवले, अनिल पिंगळे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सागर काशिनाथ कुरंगळे व त्यांच्या पदाधिकार्‍यांनी अथक परिश्रम घेतले.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply