Breaking News

पुलवामा हल्ल्याप्रकरणी सात जण ताब्यात

श्रीनगर : पुलवामातील अनंतपुरा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्याप्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांनी शनिवारी (दि. 16) सात जणांना ताब्यात घेतले. पुलवामा आणि अवंतीपुरा भागात ही कारवाई करण्यात आली. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर हल्ला करण्यासाठी सुमारे 80 किलोग्रॅम आरडीएक्सचा वापर करण्यात आला आहे. आरडीएक्सचा साठा कारमध्ये भरून ही कार सीआरपीएफच्या बसवर (एचआर 49-एफ 0637) धडकवण्यात आली. जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा दहशतवादी कामरान हा पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार आहे. त्यानेच हा कट रचला आणि आदिल अहमदकरवी आत्मघाती हल्ला घडवून आणला, असा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार तपास यंत्रणा अधिक तपास करीत आहेत.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply