Breaking News

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : रायगड जिल्ह्यात पुतळे, स्मारकांवर फडकणार तिरंगा

नागोठणे ः प्रतिनिधी

भारताच्या स्वातंत्र्याला या वर्षी 15 ऑगस्ट रोजी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा अभियान सुरू केले आहे. या निमित्ताने रायगड जिल्ह्यात 13 पुतळे व स्मारकांवर तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे. त्यामुळे पुतळे आणि स्मारकांना नवी झळाळी प्राप्त होणार आहे. रायगड ही क्रांतिकारकांची भूमी असून त्यांच्या क्रांतीची साक्ष देणारी अनेक स्मारके प्रेरणा देत उभी आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अभियानांतर्गत या सर्व स्मारकांवर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय ध्वज फडकावण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक प्रशासनाने स्मारकाची साफसफाई, रंगरंगोटी सुरू केली आहे. रायगड जिल्ह्यातील प्रमुख स्मारकांमध्ये रायगड किल्ला व चवदार तळे (ता. महाड), आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके (शिरढोण, ता.  पनवेल), हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील (मनिवली, ता. कर्जत), नरवीर तानाजी मालुसरे (उमरठ, ता. पोलादपूर), सरखेल कान्होजी आंग्रे (अलिबाग), हुतात्मा स्मारक व जंगल सत्याग्रह (चिरनेर, ता. उरण), आचार्य विनोबा भावे (गागोदे बुद्रुक, ता. पेण), समरभूमी उंबर खिंड (चावणी, ता. खालापूर) ही स्मारके तसेच आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, हुतात्मा हिराजी पाटील, नरवीर तानाजी मालुसरे, सरखेल कान्होजी आंग्रे आदी पुतळ्यांंचा समावेश आहे. या स्मारके व पुतळ्यांना गतवैभव प्राप्त होत आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply