Breaking News

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गुरुवारी पुन्हा सुनावणी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर बुधवारी (दि. 3) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या संदर्भात गुरुवारी पुढील सुनावणी होणार आहे. कामकाज सुरू झाल्यानंतर ही सुनावणी पहिल्या क्रमांकावर असेल, असे सरन्यायाधीश रमणा यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारमधील 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईला आव्हानासह अन्य याचिकांवर बुधवारी सुनावणी झाली. या वेळी शिंदे गटाकडून हरीश साळवे, नीरज किशन कौल आणि महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला, तर ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडली. बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवरुन सुरू झालेली कायदेशीर लढाई आता शिवसेना कोणाची यावर येऊन पोहचली आहे. आजच्या सुनावणीत मूळ पक्ष कोणता, आमदारांची अपात्रता यावर युक्तिवाद झाला. सरन्यायाधीश रमणा यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय पीठ या प्रकरणाची सुनावणी झाली सुनावणीदरम्यान शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी घटनेचा दहाव्या सूचीचा मुद्दा मांडत बंडखोरांनी दुसर्‍या पक्षात विलिन होणे हाच पर्याय असल्याचे म्हटले. त्यावर शिंदे गटाकडून हरिश साळवे यांनी पक्ष सोडले नाही तर पक्षांतर बंदी का, असा सवाल उपस्थित करीत बहुमत गमावलेल्या नेत्यासाठी पक्षांतर बंदी कायदा शस्त्र नाही, असा युक्तिवाद केला. कोर्टाने आज दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणावर पुढील सुनावणी गुरुवारी ठेवण्यात आली आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply