Breaking News

पनवेलमध्ये कारसेवकांचा सत्कार

राम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना दिवस सर्वांसाठी आनंदाचा -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : वार्ताहर
रामजन्मभूमी मंदिराला पूर्ववैभव मिळवून देण्यासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गुरुवारी (दि. 18) कारसेवकांचा विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी, अयोध्येत येत्या 22 तारखेला प्रभू श्री रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाणार आहे. हा दिवस सर्वांसाठी उत्साहाचा, आनंदाचा व जल्लोषाचा असेल तसेच एक आगळीवेगळी दिवाळी पनवेलमध्ये साजरी होईल, असे प्रतिपादन केले.
अयोध्या येथील भव्य राम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारी रोजी केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाच्या वतीने पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये कारसेवकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. तत्पूर्वी पनवेल शहरातून विसावा हॉटेल ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रॅली काढण्यात आली होती.
या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, दादा जोशी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, अनूसुचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील, माजी नगरसेविका दर्शना भोईर, प्रमुख वक्ता म्हणून नंदकुमार मराठे आदी उपस्थित होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते कारसेवकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परेश मुरबाड, मुकेश उपाध्ये, सुभाष कडव, नितीन केळकर, हेमंत अधिकारी, संजय उलवेकर यांच्यासह विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे सहकार्य लाभले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply