Breaking News

रायगड उरण धनविन संघ प्रथम

आमदार चषक 2022 रबर बॉल स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या आमदार चषक 2022 रबर बॉल स्पर्धेत रायगड उरण धनविन संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. मिडल क्लास हौंसिंग सोसायटीच्या मैदानात ही स्पर्धा दोन दिवस रंगली. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 5) झाला. या वेळी त्यांनी विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला.
पनवेल शहरातील मिडल क्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानात आमदार चषक 2022 ही रबल बॉल क्रिकेट स्पर्धा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, प्रशांत कर्पे, सुमित झुंझारराव यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते झाले, तर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले.
या स्पर्धेत रायगड उरण धनविन संघाने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना 50 हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक पटकावलेल्या कोळेश्वर कोळीवाडा पनवेल संघाला 25 हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज म्हणून संकेत रानडे, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून हर्षद कोळी, मालिकावीर म्हणून योगेश पवार यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या वेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, विकास घरत, सुखम हॉस्पिटलचे डॉ. संतोष जाधव, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, युवा मोर्चाचे उत्तर रायगड अध्यक्ष मयुरेश नेतकर, युवानेते हॅप्पी सिंग, दिनेश खानावकर, अभिषेक भोपी, चिन्मय समेल, प्रशांत कर्पे,सुमित झुंझारराव, राकेश भूजबळ, सौरभ कुलकर्णी, उल्हास झुंझारराव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि खेळाडू उपस्थित होते.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply