नवी मुंबई ः बातमीदार – गेल्या काही दिवसांपासून सेक्टर 20मधील खेळाडूंना शनी मंदिरासमोर हायटेन्शन खाली मोकळ्या भूखंडाचा एकमेव आधार असून या मैदानावर खेळण्यासाठी अनेक जण येतात, मात्र काही दिवसांपासून या मैदानावर गवत वाढल्याने खेळाडूंना खेळता येत नव्हते. गवत वाढल्याने सरपटणार्या प्राण्यांचा वावर असण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब नागरिकांनी भाजपचे सामाजिक कार्यकर्ते राहुल शिंदे यांच्या कानावर घातली असता शिंदे यांनी स्वखर्चाने जेसीबी लावून हे मैदान स्वच्छ करून खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिले आहे.
या मैदानात गवत वाढल्याच्या अनेक तक्रारी शिंदे यांना प्राप्त झाल्या होत्या. परिणामी आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात डास व सापांचा वावर होत असल्याने रहिवाशांना त्रासास सामोरे जावे लागत होते. त्यामुळे हा भूखंड साफ करून देण्याची मागणी वाढत होती. शिंदे यांना ही बाब कळताच त्यांनी तातडीने जेसीबी लावून गवत काढून व माती एकसंध करून मैदान खेळण्यासाठी उपलब्ध करून दिले.