Breaking News

टेबल टेनिस स्पर्धेस उदंड प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त

नवी मुंबई स्पोर्ट्स व सामाजिक विकास मंडळ यांच्या विद्यमाने नवी मुंबई व रायगड जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन 29 व 30 जून रोजी नवीन पनवेल सेक्टर 18 येथील सिडको समाज मंदिरात करण्यात आले होते. या स्पर्धेत 247 खेळाडूंनी सहभाग घेत उदंड प्रतिसाद दिला.

स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या उपाध्यक्ष स्नेहल कडू यांच्या हस्ते, तर बक्षीस वितरण शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते व रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष संजय कडू़, तसेच सचिन नाईक यांच्या झाले. या वेळी क्रीडा रसिक उपस्थित होते.

स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून डी. आर. साळसकर, सहाय्यक पंच पराग अंकोलेकर व राजेश कुरबेट यांनी काम केले. स्पर्धेमध्ये 274 टेबल टेनिस खेळाडू सहभागी झाले होते.

गटनिहाय विजेते, उपविजेते

नवोदित मुली मनाली चिलेकर सीकेटी हायस्कूल नवीन पनवेल, हृतिका कुशवाहा एपिजय स्कूल नेरूळ, नवोदित मुले अर्चित वझे सेंट जोसेफ हायस्कूल नवीन पनवेल, हर्षद कुदळे न्यू होरॉयझन स्कूल नवीन पनवेल, 10 वर्षाखालील मुले आरव दशमाना एपिजय स्कूल नेरूळ, ओजस लोथे डीएव्ही स्कूल नवीन पनवेल, 12 वर्षाखालील मुली आदिती जाधव डीएव्ही स्कूल नवीन पनवेल, अनिशा पात्रा डीएव्ही इंटरनॅशनल स्कूल खारघर, मुले सिद्धार्थ गुब्बाला डी.वाय.पाटील इंटरनॅशनल स्कूल नेरूळ, स्वस्तिक कुंडू डीएव्ही स्कूल नवीन पनवेल, 14 वर्षाखालील मुली आदिती जाधव, सान्वी जैन रायन इंटरनॅशनल स्कूल खारघर, मुले सिद्धार्थ गुब्बाला, तुषार खांडेकर बालभारती स्कूल खारघर, 17 वर्षाखालील मुली आदिती जाधव, सारा गणेश फादर अ‍ॅग्नेल मल्टीर्पपज स्कूल वाशी, मुले सिद्धार्थ गुब्बाला, अर्णव द्विवेदी बालभारती स्कूल खारघर, युथ मुली संस्कृती शर्मा डीएव्ही स्कूल नवीन पनवेल, सारा गणेश फादर अ‍ॅग्नेल मल्टीर्पपज स्कूल वाशी, मुले सिद्धार्थ गुब्बाला, आदित्य मित्रा पनवेल, 12 वर्षाखालील मुली दुहेरी आदिती जाधव व व इशा जाधव, अवनी कुरबेट डीएव्ही स्कूल नवीन पनवेल व मनाली चिलेकर सीकेटी हायस्कूल नवीन पनवेल, मुले सिद्धार्थ गुब्बाला व स्वस्तिक कुंडू, मांगल्य खानावकर व स्यामंतक ढवळे डीएव्ही स्कूल नवीन पनवेल, 14 वर्षाखालील मुली दुहेरी रित शर्मा व तन्वी कदम सेंट जोसेफ हायस्कूल नवीन पनवेल, रसिका खाडे व आर्या म्हात्रे सेंट जोसेफ हायस्कूल नवीन पनवेल, मुले सिद्धार्थ गुब्बाला व तुषार खांडेकर, सोहम लोध डीपीएस पळस्पे व अर्जुन बिश्वास डीएव्ही स्कूल नवीन पनवेल, पुरुष दुहेरी पृथ्वेश मंडले नवीन पनवेल व सार्थक गुप्ता खारघर, अर्णव द्विवेदी व स्नेहील सारंगी एपिजय स्कूल खारघर, महिला एकेरी संस्कृती शर्मा, आदिती जाधव, पुरुष एकेरी जितेंद्रकुमार टाक तळोजा़, सिद्धार्थ गुब्बाला, ज्येष्ठ समीर शिंदे, गौरव शिखरे दोघेही नवी मुंबई.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply