Breaking News

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खोपोलीत भाजप युवा मोर्चातर्फे बाईक रॅली

खोपोली : प्रतिनिधी

भारतीय जनता युवा मोर्चा खोपोली शाखेच्या वतीने हर घर तिरंगा या अभियानांतर्गत बुधवारी (दि. 10) शहराच्या शिळफाटा ते खोपोली गाव अशी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आली होती.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिळफाटा येथील पूर्णाकृती पुतळ्यास युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेटकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर बाईक रॅलीस प्रारंभ झाला. युवा मोर्चाचे खोपोली शहर अध्यक्ष अजय इंगुलकर, सरचिटणीस विनायक मांडपे, भाजप शहर सरचिटणीस हेमंत नांदे, प्रमोद पिंगळे, कामगार सेलचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत देशमुख, महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष शोभा काटे, उपाध्यक्ष अपर्णा साठे, सरचिटणीस अश्विनी अत्रे, ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र शेटे, हिम्मतराव मोरे, ओबीसी सेलचे सुनील नांदे, कामगार सेल खोपोली अध्यक्ष अनिल कर्णूक, युवा मोर्चाचे कार्यकर्ते सागर काटे, मयुर रेटरेकर, प्रथमेश पाटील, सिद्धेश पाटील, मनीष मासये इत्यादीसह अनेक कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते.  रॅलीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी तिरंगा ध्वज हातात घेतला होता व भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणा दिल्या. खोपोली गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर रॅलीची सांगता झाली, या वेळी कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply