सिद्धेश्वरमध्ये सलग तिसर्या वर्षी उभारला बंधारा


पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर बुद्रुक गावातील महिलांनी पाणी संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. या वर्षीदेखील सर्व महिलांनी मिळून येथील ओढ्यावर मातीचा बंधारा बांधून पाणी अडविले आहे.
पाण्याचे महत्व लक्षात घेऊन सिद्धेश्वर बुद्रुक गावातील महिला मागील तीन वर्षांपासून पाणी अडवण्यासाठी श्रमदान करीत आहेत. हातात कुदळ, फावडे घेवून या महिलांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. खडी, वाळू व माती गोण्यामध्ये भरुन डोक्यावर उचलून ओढ्यावर बंधारा बांधण्यात आला. बंधारा बांधण्यासाठी प्राची यादव, मनीषा पोंगडे, रेखा यादव, राजेश्री सालसकर, भारती जाधव, सरिता सावंत, गुलाब आजीवले, लता पवार, सुनीता वाघमारे, तारा वाघमारे, लक्ष्मी पवार, आंजना पवार, जयेश्री पोंगडे, चंपा जाधव, माई यादव, सविता सावंत व माई वाघमारे यांच्यासह गावातील सर्व महिलांनी श्रमदान केले. त्यांना दतात्रेय वाघमारे, आनंत सालसकर, आशिष यादव, सुनील पोंगडे, गणेश महाले, सचिन मुंढे व प्रसन्न यादव यांनी सहकार्य केले. सरपंच उमेश यादव यांचाही पाठिंबा व सहकार्य मिळाले.
गावातील सर्व महिलांनी यंदाही बंधारा बांधण्याचे काम अगदी मेहनतीने व मनापासून केले आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षापासून पाणी संवर्धन करणे सहज शक्य होत आहे.
-उमेश यादव, सरपंच, सिद्धेश्वर, ता. सुधागड