Breaking News

अडीच वर्षांच्या चिमुरड्याकडून किल्ले रायगड सर

नेरळच्या वेदांत साळुंखेची कमाल

कर्जत ः बातमीदार

नेरळ येथील अडीच वर्षीय वेदांत विशाल साळुंखे या बालकाने ऐतिहासिक किल्ले रायगड अवघ्या पावणेदोन तासांत सर करण्याचा पराक्रम केला आहे. 2900 फुटांवरील आणि 1,435 पायर्‍या असलेला हा किल्ला कोणत्याही आधाराविना चढल्याबद्दल वेदांतचे सर्वत्र कौतुक होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून निवडलेला आणि अवघड समजला जाणारा किल्ले रायगड चढून सर करण्याचा निर्णय वेदांतने घेतला. त्यानुसार 7 ऑगस्ट रोजी वेदांत हा आई-वडील आणि काका-काकी यांच्यासह नेरळ येथून रवाना झाला. सर्वांनी 11 वाजून 10 मिनिटांनी किल्ल्याच्या पायर्‍या चढण्यास सुरुवात केली. न थकता पावणे दोन तासांत वेदांत किल्ल्यावर पोहचला. किल्ल्यावर पोहचल्यावर वेदांतने बहीण लावण्या आणि अनुष्का या दोघींसह प्रथम होळीच्या माळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्या वेळी तेथे उपस्थित सर्वांनी वेदांतच्या या कामगिरीचे कौतुक केले. तेथून वेदांतने राजदरबारातील मेघडंबरी येथील शिवरायांच्या सिंहासनाधिष्टीत पुतळ्याला वंदन केले. मग तो महाराजांची समाधीस्थळी गेला व नतमस्तक झाला. शेवटी किल्ल्याचा परिसर फिरून वेदांत परतला.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply