Breaking News

तळोजात आग लागून दुकान जळून खाक

कळंबोली ः रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यातील तळोजा मजकूर गावातील एका दुकानाला शुक्रवारी (दि. 12) रात्री दीड वाजता भीषण आग लागली. आगीत सामानसहित संपूर्ण दुकान जळून खाक झाले. यामध्ये कोणतीही जीवितहानी सुदैवाने झाली नाही, मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग विझवण्यासाठी तळोजा व खारघर अग्निशामक दलाला पाचारण करावे लागले. आग कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही.

तळोजा मजकूर येथे 70 ते 80 वर्षांपूर्वीच्या जुन्या ठेवणीतील सागवानी घरामध्ये दुकान होते. शुक्रवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास दुकानात अचानक आग लागली. ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र लाकडी सामान जास्त असल्याने आगीच्या ज्वाला भडकू लागल्या. तातडीने तळोजा व खारघर मधील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर काही वेळाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, मात्र तोपर्यंत दुकानातील सामान पूर्णतः जळून भस्मसात झाले. याबाबत तळोजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जबाब नोंदवून घेतला.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply