माणगाव : प्रतिनिधी
माणगाव तालुक्यातील चांदोरे गावाच्या हद्दीत ओढ्यामध्ये बेवारस स्थितीत पडलेली एक कार पोलीस व रेस्क्यू टीमने मंगळवारी (दि. 16) क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढली. बेवारस स्थितीत ओढ्यामध्ये सापडलेल्या या कारबद्दल नागरिकांत चर्चा रंगल्या आहेत.
चांदोरे गावच्या हद्दीतील ओढ्यात एक कार (एमएच 14-डीएफ 4167) पडली असल्याची माहिती ग्रामस्थ सुजित शिंदे यांनी मंगळवारी सकाळी 10 वाजता दूरध्वनीवरून माणगाव पोलिसांना दिली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, निरीक्षक राजेंद्र पाटील व पथकाने घटनास्थळी तातडीने जाऊन पाहणी केली. त्या वेळी त्यांना पांढर्या रंगाची गाडी ओढ्यात अर्धवट बुडालेल्या अवस्थेत दिसली. ही कार रेस्क्यू टीमच्या विशेष मदतीने व क्रेनच्या सहाय्याने पाण्याबाहेर काढण्यात आली. पोलीस या गाडीची अधिक चौकशी करीत आहेत.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …