Breaking News

रायगडात पक्ष्यांची दुनिया बहरली

विविध प्रजातींचे दर्शन, अभ्यासक, निरीक्षकांना पर्वणी

सुधागड : रामप्रहर वृत्त
दमदार पावसाने निसर्ग खुलला असून पक्ष्यांसाठी आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात सध्या देशी-परदेशी पक्ष्यांचे दर्शन होत आहे. पक्षी अभ्यासक व निरीक्षकांना ही पर्वणी मानली जात आहे.
जिल्ह्यात पावसाळ्यात विविध पक्ष्यांचे दर्शन घडते. अनेक पक्षांचा हा विणीचा हंगामसुद्धा आहे. जिल्ह्यात परदेशी तिबोटी खंड्याचे आगमन झालेले आहे. त्याबरोबरच जांभळी लिटकुरी, नीलिमा/नीलमणी, सोनपाठी सुतार, पाणथळ जागेत राहणारे टिबुकली, आशियाई मुग्धबलाक, रात-बगळा, मराल आदी पक्ष्यांचेही दर्शन होत आहे.
जिल्ह्यात पनवेलजवळ कर्नाळा हे पक्षी अभयारण्य आहे, तर मुरूड येथे फणसाड अभयारण्य आहे. शिवाय जैवविधेतेने समृद्ध असे 136 अधिकृत पाणथळ प्रदेश आहेत. तेथेही विपूल प्रमाणात पक्षी आढळतात.

समृद्ध जैवविविधता, मुबलक खाद्य, अनुकूल हवामान यामुळे रायगड जिल्ह्यात निरनिराळ्या प्रकारचे पक्षी आढळतात. पावसाळ्यात तर पक्षी निरीक्षणाची पर्वणी असते. विविध ठिकाणचे पक्षी निरीक्षक येथे पक्षी निरीक्षणासाठी येतात.
-राम मुंडे, पक्षी अभ्यासक व निरीक्षक

 

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply