Breaking News

सीवूड्स परिसरात किड्यांनी नागरिक त्रस्त

नवी मुंबई : प्रतिनिधी

नेरूळ भागातील सीवूड्स परिसरात किड्यांनी उच्छाद मांडला असून या किड्यांमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. सीवूड्स रेल्वेस्थानकातून सेक्टर 50च्या दिशेने नवी मुंबई महानगरपालिकेकडे जाणार्‍या रोडवर या किड्यांचा गेली दोन दिवस सुळसुळाट झाला आहे. परिसरातील रोड, सोसायटीच्या भिंती आणि झाडांवर हजारो किडे आहेत. हे किडे अंगावर पडल्याने नागरिकांच्या शरीराला खाज येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. नवी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून ऊन पडत असून संध्याकाळच्या सुमारास विजा आणि गडगडाटासह पाऊसही पडत आहे. या बदललेल्या वातावरणामुळे सीवूड परिसरात किड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिसरातील अनेक झाडांवरही किड्यांनी बस्तान बसवले आहे. या रस्त्यांवरून जाणार्‍या-येणार्‍या दुचाकीस्वारांच्या अंगावर हे किडे पडत असून यामुळे अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. परिसरातील लोकांनी, तसेच लोकप्रतिनिधींनी महानगरपालिकेकडे याबाबत तक्रारही केली. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट देत परिसराची पाहणी केली.

Check Also

खोपोली येथील विविध समाज घटकांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खोपोली : प्रतिनिधीभाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा पनवेलचे कार्यसम्राट …

Leave a Reply