नालासोपारा : प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यातील नालासोपारा भागात एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह रेल्वेरुळावर आढळून आले असून, 10 वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचे दिसत आहे, असे पोलिसांनी म्हटलेय, तर मालगाडीसमोर चौघांनी उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
नालासोपारा स्टेशनजवळ रेल्वेरूळावर शनिवारी (दि. 19) एका पुरुष व दोन महिलांचे मृतदेह, तर एक मुलगी गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. मृतांमध्ये सोमनाथ पोपट जंगम (वय 31), नंदा पोपट जंगम (55) आणि प्रेमिला पोपट जंगम (35) यांचा समावेश असून, समीक्षा फडतरे (10) गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व जण विरारमधील पूर्व साईनाथ नगर येथील रहिवाशी आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Check Also
पनवेल रेल्वेस्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानक परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे …