माणगाव : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणार्या लोकोपयोगी योजना तळागाळापर्यंत पोहचवा आणि भाजपचे विचार समाजात रूजवा, असे प्रतिपादन केंद्रीय अन्न प्रक्रिया, उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी मंगळवारी (दि. 23) केले. भाजपच्या रायगड लोकसभा प्रवास योजनेदरम्यान माणगाव गांधी मेमोरियल हॉलमध्ये आयोजित लोकप्रतिनिधींच्या संवाद बैठकीत ते बोलत होते.
केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल हे रायगड जिल्ह्याच्या दौर्यावर असताना त्यांनी माणगाव येथे लोकप्रतिनिधी तसेच डॉक्टर व वकिलांशी संवाद साधला. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष राजेश मपारा, सरचिटणीस मिलिंद पाटील, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष हेमा मानकर, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमित घाग आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
लोकप्रतिनिधींच्या बैठकीत संवाद साधताना केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल पुढे म्हणाले, लोकसभा निवडणूक दीड वर्षावर येऊन ठेपली आहे.त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न, त्यांचे आचार-विचार, पक्षाचे लोकाभिमुख धोरण तसेच केंद्राच्या विविध लोकाभिमुख योजना यांचा प्रचार व प्रसार करणे लोकप्रतिनिधींनी करणे आवश्यक आहे. स्वच्छ भारत कार्यक्रम केंद्राने हाती घेतल्यावर अनेक गावे भाजप सरकारच्या कारकिर्दीत स्वच्छ झालेली दिसत आहेत. गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी लोककल्याणकारी योजना भाजप सरकारने सुरू केलेल्या असून या योजनांचा लाभ तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवून गाव, वस्ती, वाडीवरील अजून काही प्रश्न व समस्या असतील त्या जाणून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न करा.
प्रारंभी ना. प्रल्हादसिंह पटेल यांचे माणगाव नगरीत भाजपच्या वतीने प्रदेश सरचिटणीस रवीभाऊ मुंढे, तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे, ज्येष्ठ नेते नाना महाले, माजी तालुकाध्यक्ष सुरेंद्र साळी, उपाध्यक्ष यशोधरा गोडबोले, शहराध्यक्ष नितीन दसवते, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष अश्विनी महाडिक, पाणीपुरवठा सभापती राजेश मेहता, युवा नेते चिन्मय मोने, बाबूराव चव्हाण, विशाल गलांडे व सहकार्यांनी जोरदार स्वागत केले. ठिकठिकाणी पक्षाचे झेंडे व बॅनर्स लावल्याने वातावरण भाजपमय झाल्याचे दिसून आले.
Check Also
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …