Breaking News

डोक्यावरील विगमध्ये लपवले सोने

पुणे ः प्रतिनिधी

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाने आलेल्या एका व्यक्तीकडून 31 लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. पुणे विमानतळावरील कस्टमच्या अधिकार्‍यांनी ही कारवाई केली. शेझाद बाबा मिया मोमीन या व्यक्तीकडून हे सोने जप्त करण्यात आले.

एअर इंडियाच्या विमानाने शेझाद बाबा मिया मोमीन पुणे विमानतळावर आला असता कस्टमच्या अधिकार्‍यांना संशय आल्याने त्यांनी त्याची तपासणी केली. तपासणीमध्ये मोमीन याच्याकडे 957.10 ग्रॅम इतके सोने आढळून आले. या सोन्याची किंमत तब्बल 31 लाख 13 हजार 446 इतकी आहे. या व्यक्तीने डोक्यावरील विगच्या बेल्टमध्ये हे सोने लपवले होते. हे सोने भारतात तस्करीसाठी आणण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने अधिकार्‍यांनी सर्व सोने ताब्यात घेतले, तसेच कस्टमच्या कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवाशाकडे करण्यात आलेल्या चौकशीत त्याने सोने तस्करीसाठी आणल्याचे कबूल केले आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Check Also

काला पानी @ ६८; राज खोसला आणि देव आनंद जोडीची रहस्यरंजकता…

दिग्दर्शक राज खोसला यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु आहे. जन्म ३१ मे १९२५. आणि मृत्यू ९ …

Leave a Reply