मुंबई ः रामप्रहर वृत्त
दलित-बहुजन समाजातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्यात येणार्या मागील चार ते पाच वर्षांपासून फेलोशिपचा विषय आमदार प्रशांत ठाकूर यांनी तारांकित प्रश्नाद्वारे मांडला. त्यावर मंत्री संजय शिरसाट यांनी, टीआरटीआय, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत आणि इतर तत्सम स्वायत्त संस्थांमार्फत राबविल्या जाणार्या अधिछात्रवृत्ती योजनेच्या निकष आणि नियमावलीबाबत योग्य कार्यवाही लवकरच करण्यात येणार असून सध्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. विभागाचा अहवाल प्राप्त होताच योग्य ती कार्यवाही तत्काळ करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
राज्यातील दलित-बहुजन समाजातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्यात येणार्या मागील चार ते पाच वर्षांपासून फेलोशिपच्या विलंबामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आले असून पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांसाठी समान धोरण रद्द करून विद्यार्थ्यांच्या हिताचे न्यायपूर्ण धोरण राबविण्याची मागणी समर्थन संस्थेने मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री, महासंचालक, डॉ. बाबासाहेब संशोधन आणि प्रशिक्षण व मानव विकास संस्था यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे 22 डिसेंबर 2025 रोजी वा त्यादरम्यान केली आहे. याबाबत शासनाने चौकशी करून त्यानुषंगाने सदर भागातील विद्यार्थ्यांसाठी बार्टी, सारथी व महाज्योती इत्यादी संस्थेच्या पीएचडी फेलोशिप जाहिरात नियमित प्रसिध्द करण्यासाठी व इतर काही मागण्यांबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी दाखल केला होता.
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी लेखी उत्तरात सांगितले की, राज्यातील दलित-बहुजन समाजातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्यात येणार्या मागील चार ते पाच वर्षांपासून फेलोशिपच्या विलंबामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची बाब खरी असून सन 2022पर्यंत स्वायत्त संस्थांमार्फत देण्यात येणार्या अधिछात्रवृत्ती/शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला आहे. सन-2022मध्ये बार्टी (विद्यार्थी संख्या 763), सारथी (विद्यार्थी संख्या 1329), महाज्योती (विद्यार्थी संख्या 1453 अशा एकूण 3545 संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती/शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत टीआरटीआय, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत व इतर तत्सम स्वायत्त संस्थांमार्फत देण्यात येणार्या अधिछात्रवृत्ती/शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्याकरिता सन 2023 व सन 2024 या वर्षाच्या अधिछात्रवृत्ती योजनेची जाहिरात प्रसिद्ध करावयाची कार्यवाही सुरू आहे. टीआरटीआय, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत व इतर तत्सम स्वायत्त संस्थामार्फत सर्वंकष धोरणातंर्गत राबविण्यात येणार्या विविध योजनांची अंमलबजावणी करताना येणार्या अडचणींचा आढावा व या स्वायत्त संस्थांच्या वार्षिक कृती आराखड्यास मान्यता देण्याच्या अनुषंगाने उपरोक्त विषयाबाबत मुख्य सचिव महोदयांच्या अध्यक्षतेखाली 11 सप्टेंबर 2025 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अधिछात्रवृत्ती योजनेंतर्गत युजीसीमार्फत विहित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करून अधिछात्रवृत्ती योजनेचे निकष उच्च व तंत्र शिक्षण विभागाने तयार करावेत. यामध्ये विद्यार्थ्यांचा वार्षिक प्रगती अहवाल तपासून उर्वरित अनुदान वितरीत करण्याच्या प्रक्रियेचा समावेश करून त्यानुसार कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल 15 दिवसांत सादर करावा, अशा उच्च व तंत्र शिक्षण विभागास सूचना देण्यात आल्या होत्या.
यापूर्वी टीआरटीआय, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत व इतर तत्सम स्वायत्त संस्थांमार्फत देण्यात येणार्या अधिछात्रवृत्ती/शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्याकरिता विद्यार्थ्यांमार्फत करण्यात येणार्या आंदोलनाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री नगर विकास, गृहनिर्माण व सा.बां. (सा.ऊ.) महोदयांच्या अध्यक्षतेखाली 28 ऑक्टोबर 2025 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाने अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश देण्यात आले होते. यानुषंगाने या विभागामार्फत टीआरटीआय, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत व इतर तत्सम स्वायत्त संस्थांमार्फत राबविण्यात येणार्या अधिछात्रवृत्ती योजनेचे निकष व नियमावलीसंबंधी पुढील उचित कार्यवाही लवकरात लवकर करणेबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागास विनंती करण्यात आली होती. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून त्यांचा अहवाल प्राप्त होताच पुढील योग्य ती कार्यवाही तत्काळ करण्यात येईल.
Check Also
Higher RTP Casino Online game: Contract if any Contract Black-jack (% based on application vendor)
Online casino bets to the lowest home boundary Banker Wager within the Baccarat – In …
RamPrahar – The Panvel Daily Paper