Breaking News

रोह्यातील डॉ. देशमुख महाविद्यालयाला राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यापीठ स्तरीय सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार

रोहे : प्रतिनिधी

कोकण एज्युकेशन सोसायटीच्या रोहे येथील डॉ.चिंतामणराव देशमुख वाणिज्य व सौ. कुसुमताई ताम्हाणे कला महाविद्यालयाला मुबंई विद्यापीठ स्तरीय राष्ट्रीय सेवा योजना सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. शिक्षक दिनानिमित्त मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील फिरोजशहा मेहता भवनात झालेल्या  कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते डॉ. देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल साळुंके यांनी नुकताच हा सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार स्वीकारला. या वेळी प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुळकर्णी, प्रभारी कुलसचिव शैलेंद्र देवळाणकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. डॉ. चिंतामणराव देशमुख वाणिज्य व सौ. कुसुमताई ताम्हाणे कला महविद्यालयाने नियमित व निवासी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून केलेली कामगिरी व विद्यापीठ व राज्यस्तरावरील केलेले शिबिरांचे आयोजन या कामगिरीची दखल घेवून मुबंई विद्यापीठाने या महाविद्यालयाची सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कारासाठी निवड केली. सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार मिळाल्याबद्दल रोहा पंचक्रोशीत डॉ. चिंतामणराव देशमुख वाणिज्य व सौ. कुसुमताई ताम्हाणे कला महविद्यालयाचे कौतुक होत आहे.

Check Also

जनहितासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा नेहमीच पुढाकार -मंत्री गणेश नाईक

आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर संस्कारी असल्याचेही गौरवोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर …

Leave a Reply