Friday , September 29 2023
Breaking News

‘टीआयपीएल’ नामांकितच! पराचा कावळा करू नये!!

पनवेल : रामप्रहर वृत्त

शहरवासीयांना नागरी सुविधा पुरविताना योग्य ती खबरदारी घेऊन या सुविधा देण्याचा प्रयत्न संबंधित आस्थापना आणि ठेकेदार मंडळी करीत असतात. अनेकदा इन्फ्रास्ट्रक्चरची कामे करीत असताना छोट्या-मोठ्या घटना घडतात, परंतु कामे करताना नागरिकांना कोणताही धोका पोहोचू नये, यासाठी संबंधितांकडून योग्य ती काळजी घेतली जाते आणि नेमकी तीच काळजी दोन्ही घटनांच्या वेळी टीआयपीएल कंपनीने घेतली आहे. त्यामुळे कोणताही अनर्थ घडलेला नाही. असे असताना पराचा कावळा करण्याची सवय असलेल्या महाशयांनी पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे कुल्हेकुई केली आहे.

टीआयपीएलच्या माध्यमातून शहरात गटारे दुरुस्तीचे काम सुरू आहे. नागरिकांना चांगल्या प्रकारे सोयी-सुविधा देण्यासाठी हे काम केले जात आहे. अशा वेळी या कामाशी संबंधित आस्थापनांचे तज्ज्ञ अधिकारीही उपस्थित असतात. तीन दिवसांपूर्वी पनवेल शहरातील मिडलक्लास सोसायटीत काम सुरू असताना महानगर गॅसवाहिनीला धक्का लागला. त्या वेळीही महानगर गॅस कंपनीचे कर्मचारी हजर होते. हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी तत्काळ गॅसपुरवठा बंद करून गॅसवाहिनी दुरुस्त केली. या प्रकाराची मिडलक्लास सोसायटीतील कुणालाही झळ पोहोचलेली नाही.

वास्तविक, मिडलक्लास सोसायटीत गॅसपुरवठ्याचे काम महानगर गॅसच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यानंतर पूर्ण शहरात टप्प्याटप्प्याने अशाचप्रकारे गॅसपुरवठा करण्यात येणार आहे, मात्र यासंदर्भात घडलेल्या घटनेबाबत रिलायन्स कंपनीची गॅसवाहिनी असा उल्लेख महाशयांनी केलेला आहे. खरे तर रिलायन्सच्या गॅसवाहिनीचे काम येथे सुरूच नाही. असे असताना स्वतःला हुशार समजणार्‍या विद्वानाने आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. त्याचबरोबर नागरिकांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केलेला आहे.

भिंगारी ते कल्पतरू येथील सबस्टेशनदरम्यानची विद्युतवाहिनी तुटल्यानंतरही टीआयपीएलने तत्परतने स्वतःचीच यंत्रणा कार्यान्वित करून महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली ही दुरुस्ती करून घेतली. त्यामुळे या दोन्ही घटनांमध्ये कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही, मात्र वीजप्रवाहाचा संबंध असल्याने अनुचित प्रकार घडू नये यासाठी काही भागांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे लोकांची काही वेळ गैरसोय झाली असली, तरी या विरोधात वृत्त लिहिताना जणू आभाळ कोसळल्याचा आव आणण्यात आला आहे.

स्वतःचे ठेवायचे झाकून…

मराठीत एक म्हण प्रसिद्ध आहे ‘स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुसर्‍याचे पाहायचे वाकून’. ही म्हण या महाशयांना तंतोतंत लागू पडते. यापूर्वी या महाशयांचाही म्हणे डम्पर, पोकलेनचा व्यवसाय होता, मात्र ज्याला आपल्या उद्योगधंद्याची घडीच नीट बसवता आली नाही, आपल्याच हलगर्जीपणामुळे धंद्यात वारंवार अपयश आले. अशा माणसाने टीआयपीएल या खरोखरच नामांकित असलेल्या कंपनीवर कारण नसताना शिंतोडे उडविण्याचा उद्योग करू नये.

Check Also

पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …

Leave a Reply