Breaking News

वरसे ग्रामपंचायत परिसरातील पूरग्रस्त भागाची पाहणी

रोहे ः पतिनिधी

रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीत  पावसाळ्यात भुवनेश्वरमधील आदर्शनगर, गणेश नगर व वैभवनगरसह लगत असलेल्या नगरमध्ये नागरी वस्तीत मोठ्या प्रमाणात पाणी  येते या नगरमध्ये हे पाणी घुसत असल्याने नागरिकांच्या घरात पाणी मोठ्या प्रमाणात येत असून याचा त्रास नागरिकांना होत आहे. हे पाणी मानवनिर्मित अडथळ्यामुळे म्हणजे बिल्डरांनी नैसर्गिक नाल्यावर केलेल्या बांधकामामुळे येत आहे. या पावसाळयात मोठया प्रमाणात नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने नागरिकांनी तहसिलदार कविता जाधव यांच्याकडे तक्रार केली होती. याची दखल तहसिलदर कविता जाधव यांनी घेत घटनास्थळी पाहणी करण्याचे आदेश दिले होते. शनीवारी सायंकाळी महसूल, पंचायत समिती व बांधकाम विभागाने या परिसराची भर पावसात पाहणी केली.

यावेळी विस्तार अधिकारी फडतरे, तलाठी ठोंबरे, ग्रामसेवक गुत्त, अभियंता  जुजगार, ग्रामपंचायत सदस्य नरेश पाटील, राकेश गुरव, तुषार शिंदे, गणेश शिवलकर, छाया सुर्वे, रामा म्हात्रे, मनोहर सुर्वे, अशोक निकम, विजय दिवकर, देवरे, राम करंजे, राकेश करंजे आदीसह आदर्शनगर, वैभवनगर, गणेशनगरसह भुवनेश्वरमधील नागरिक उपस्थित होते.

तालुक्यातील सर्वात मोठी असलेली ग्रामपंचायत वरसेमध्ये भुवनेश्वर हा परिसर आता विकसित होते आहे. विकसित होत असताना अनेक बिल्डींग या ठिकाणी उभ्या राहिल्या. तर अनेक घरे या परिसरात झाली. हे होत असताना अनेक ठिकाणी नैसर्गिक नाले अडवले गेले, काही ठिकाणी गटारेच नाही, याचा फटका या वस्तीत असलेल्या घरांना या वेळी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात बसला आहे. घरात तीन ते चार फूट पाणी साचल्याने नागरिकांना त्रास झाला.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply