मॉस्को : वृत्तसंस्था
महाराष्ट्रभूमीचे महान सुपूत्र लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा रशियाकडून गौरव करण्यात आला आहे. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये साठे यांचा पुतळा, तैलचित्र उभारण्यात आले आहे. यांचे अनावरण मंगळवारी (दि. 13) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना म्हटले की, रशियात भारतीय संस्कृती जपल्याचा गर्व वाटत आहे. जे वंचितांचे आवाज होते, शिक्षण नसतानाही पुस्तके, कथा, पोवाडे लिहिले, सामाजिक सुधारणेसाठी प्रयत्न केले, भारतीय स्वतंत्रता संग्राममध्ये तसेच गोव्याच्या मुक्तीसंग्रामध्ये ज्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे त्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा गौरव आज रशियाने केला याचा अतिशय आनंद आहे. त्याचबरोबर मला या लोकार्पण सोहळ्याची संधी दिली याबद्दल आभारी आहे.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा गौरव आणि भारत- रशिया संबंध दृढ करण्याच्या अनुषंगाने त्यांचा पुतळा रशियातील मार्गारिटा रुडोमिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर या प्रसिद्ध ग्रंथालय संस्थेने पुतळा मॉस्को शहराच्या मधोमध अनेक आंतरराष्ट्रीय विभूतींसोबत बसविला आहे. या पुतळ्याचे व तैलचित्राचे अनावरण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. याद्वारे साठे यांच्या कार्याला सलाम करण्यात आला आहे.
Check Also
शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …