Breaking News

कुंबळेंच्या क्रिकेट समितीवर कोहलीचा निशाणा

चेन्नई ः वृत्तसंस्था
 इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा 227 धावांनी पराभव झाला. यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहचण्याचे भारताचे अलंडविरुद्धच्या पराभवानंतर विराट कोहलीने अनिल कुंबळेंच्या नेतृत्वातील आयसीसी क्रिकेट समितीवर निशाणा साधला आहे.
कोरोना लॉकडाऊनमुळे मागच्या वर्षी फार टेस्ट खेळल्या गेल्या नाहीत. त्यामुळे कुंबळेंच्या नेतृत्वातील आयसीसी क्रिकेट समितीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नियमांमध्ये बदल केले. प्रत्येक टीमच्या विजयी टक्केवारीवर त्या टीमची क्रमवारी ठरवण्यात येईल, असा निर्णय आयसीसी क्रिकेट समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या नव्या नियमावर बोट धरून विराटने टोला हाणला आहे. लॉकडाऊनमध्ये नियम बदलले गेले तर या गोष्टी टीमच्या हाताबाहेरच्या आहेत, असे विराट म्हणाला.
मैदानात काय करायचे याच गोष्टी आमच्या हातात आहेत. पॉइंट्स टेबल किंवा बाहेरच्या इतर गोष्टींची आम्हाला चिंता नाही. काही गोष्टींसाठी लॉजिक नसते. त्या गोष्टींवर तुम्ही तासन्तास वाद घालू शकता, पण मैदानात चांगली कामगिरी करणे हेच आमच्या हातात आहे, अशी प्रतिक्रिया विराटने दिली आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply