Breaking News

कोरोनामुळे व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांना भाजपकडून आधार

नगरसेवकांकडून प्रभागामध्ये देण्यात आला दिवाळी फराळ

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या देशामध्ये शासनाचे अनेक प्रयत्न सुरु आहेत. लाखो नागरिकांना आपले प्राण गमावावे लागले. पनवेल तालुक्यातही कोरोनाचा कहर वाढलेला असताना अनेक नागरिकांचे मृत्यू झाले. कोरोनामुळे मयत झालेल्या कुटुंबामध्ये दु:खाचे सावट पसरलेले आहे. त्यांच्या घरात पनवेल भाजप शहर मंडल तर्फे एक परिवार म्हणून मदत करण्यात येत आहे. अशा कुटुंबांना दिवाळीचे गोड पदार्थ देऊन त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवक आपापल्या प्रभागामध्ये अशा कुटुंबाच्या घरी जाऊन दिवाळी फराळाचे वाटप करीत आहे. त्याच अनुषंगाने भाजप नगरसेविका रूचिता लोंढे यांनी प्रभाग क्रमांक 19 मध्ये ज्यांच्या कुटुंबाने कोरोनामुळे व्यक्ती गमावला अशांना दिवाळी फराळाचे वाटप केले. या वेळी कुटुंबातील सदस्यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन आभार व्यक्त केले.

 पनवेल भाजप शहर मंडलच्या वतीने लॉकडाऊनच्या काळामध्ये हातावर पोट असणारे मजूर, गरीब नागरिक, झोपडपट्टीवासीय, रोजंदारीवर आपला उदरनिर्वाह करणारे नागरिक, गरजूंना जीवनावश्यक वस्तू, अन्नदानाचे वाटप केले होते.

 पनवेल भाजप शहर मंडलच्या वतीने लॉकडाऊनच्या काळामध्ये हातावर पोट असणारे मजूर, गरीब नागरिक, झोपडपट्टीवासीय, रोजंदारीवर आपला उदरनिर्वाह करणारे नागरिक, गरजूंना जीवनावश्यक वस्तू, अन्नदानाचे वाटप केले होते.

कोरोनाच्या महामारीमुळे आपल्या शहरातील अनेक जण आज आपल्यात नाहीत, त्यांचे स्मरण आपल्याला सदैव राहील. अशा कुटुंबाच्या दु:खात भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता सहभागी आहे.

-रूचिता लोंढे, नगरसेविका

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply