Breaking News

उरणमध्ये भाजपची प्रचारात आघाडी

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी घरोघरी संपर्क

उरण : वार्ताहर

होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उरण तालुक्यात सहा ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीची रणधुमाळी दिसणार आहे. यंदाची लढत भारतीय जनता पक्ष विरुद्ध महाविकास आघाडी अशी असली तरी सर्वच ठिकाणी भारतीय जनता पक्षाची वाढलेली ताकद पाहता या केगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तालुक्यात भाजप प्रचारात आघाडीवर आहे.

केगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने नुकताच प्रचाराचा नारळ फोडला.या वेळी भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शाह, नगरसेवक राजेश ठाकूर, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, विलास काठे, अंकित म्हात्रे, आरती पाटील, गणेश पाटील, प्रशांत दर्णे, महेंद्र म्हात्रे, राजेंद्र म्हात्रे, विवेक दर्णे, प्रसाद पाटील, मिथुन पुरव, विराज म्हात्रे, उदय म्हात्रे, द्वारकानाथ ठाकूर, अरुण उपाध्ये, राकेश पाटील, हरिचंद्र पाटील, संतोष पाटील, विनोद पाटील, विजेंद्र गावंड, जितेंद्र गावंड, हिराजी कांबळे, मुन्शी कुमार यादव आदी उपस्थित होते.

दरम्यान, केगाव ग्रामपंचायत सदस्य संख्या 13 असून त्यासाठी 27 उमेदवार निवडणूक लढवतील. त्यात भाजपचे 12 उमेदवार असून पाच प्रभाग आहेत. प्रभाग क्र. 1चे उमेदवार विनेश जनार्दन पाटील (निशाणी-शिटी), श्रुती विनेश पाटील (निशाणी-बॅट); प्रभाग क्र. 2चे उमेदवार अरविंद नारायण पवार (निशाणी-कपबशी), निकिता मिथुन पुरव (निशाणी-शिटी); प्रभाग क्र. 3चे उमेदवार वैभवी विवेक दर्णे (निशाणी-बॅट), प्रिया प्रशांत दर्णे (निशाणी-शिटी); प्रभाग क्र. 4चे उमेदवार अतिष केशरीनाथ हुजरे (निशाणी-बॅट), अक्षय अशोक पाटील (निशाणी-शिटी), रुतुजा द्वारकानाथ ठाकूर (निशाणी-कपबशी); प्रभाग क्र. 5चे उमेदवार अविनाश कमळाकर पाटील (निशाणी-खटारा), जोत्सना हिराजी कांबळे (निशाणी-शिटी), रेश्मा जितेंद्र गावंड (निशाणी-कपबशी) हे उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.

केगावात फोडला प्रचाराचा नारळ

उरण तालुक्यातील केगाव, नागाव, म्हातवली, चाणजे, वेश्वी, फुंडे ह्या सहा ग्रामपंचायतींमधील निवडणूक असल्याने भाजपच्या उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. नुकताच केगावच्या विनायक येथील रिद्धी-सिद्धी गणपती मंदिराच्या प्रांगणात प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply