खारघर : रामप्रहर वृत्त
सेक्टर-3 बेलपाडा गावात जुन्या पाइपला गंज पकडल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन पाइपलाइन टाकण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते प्रभाकर घरत यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल महापालिका प्रशासनाकडे निवेदन दिले आहे. बेलपाडा गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झालेल्या आहेत. बेलपाडा गावातील लोकांना पाणी कमी प्रमाणात पुरवठा होत असतो. वीस ते बावीस वर्षांपासून लोखंडी पाइपलाइन टाकण्यात आल्या आहेत, पण त्या पाइपलाइनमध्ये गंज आल्याकारणाने पाणीपुरवठा कमी होतो. म्हणून बेलपाडा गावात पिओसीचीच नवीन पाइपलाइन टाकण्यात यावी. यामुळे गावातील लोकांना पाण्याचा पुरवठा सुरळीत होईल. पाणी जास्तीत जास्त प्रमाणात मिळेल, असे घरत यांनी निवेदनात नमुद केले आहे.