नवी मुंबई : बातमीदार
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्याने माझ्याशी आपुलकीने संवाद साधला ही खूप मोठी गोष्ट आहे, त्यांची भेट हा एक नवीन ऊर्जा देणारा अनुभव होता, अशी प्रतिक्रिया नवी मुंबईतील भाजपचे माजी नगरसेवक अमित मेढेकर यांनी दिली आहे. खारघर येथील एका नियोजित कार्यक्रमासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या तुर्भे येथे ताज विवांता हॉटेलमध्ये आल्या होत्या. तेथे त्यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत करण्याची संधी अमित यांना मिळाली. पुष्पगुच्छ देऊन त्यांनी सीतारामन यांचे स्वागत केले. या वेळी निर्मला सीतारामन यांनी थांबून अमित यांची आपुलकीने विचारपूस केली आणि त्यांच्याशी संवाददेखील साधला. आपल्या सारख्या स्थानिक पातळीवर काम करणार्या एका कार्यकत्याचीही निर्मला यांनी आठवणीने विचारपूस केली. हे त्यांचे मोठेपण आहे. त्यांच्या सारख्या नेत्याच्या या आचरणातून आपल्याला खूप शिकायला मिळाले, अशी प्रतिक्रिया अमित यांनी दिली आहे.