Breaking News

गणेशोत्सवानिमित्त बांधिलकी प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांसाठी उपक्रम

उरण : रामप्रहर वृत्त

बांधिलकी प्रतिष्ठान आयोजित गणेश उत्सव 2022 निमित्त राज्यस्तरीय गणेश आरती पठण स्पर्धा इयत्ता पहिली ते चौथीसाठी घेण्यात आली होती. या स्पर्धेबरोबर पालक मुले आणि गणेश उत्सव उपक्रमही आयोजित केला होता. गणेश उत्सव निमित्त दहा दिवस दहा विषय पालकांना दिले होते. त्यांनी ते मुलांकडून एकत्र करून घ्यायचे होते. दोन्ही उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला. राज्यातील अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, ठाणे, मुंबई, नवी मुंबई येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा निकाल दिनांक 11 सप्टेंबर रोजी लागला. गणेश आरती पठण स्पर्धेत प्रथम क्रमांक सायली सचिन भिसे (इयत्ता पहिली, चांगू काना ठाकूर विद्यालय, पनवेल), द्वितीय क्रमांक अत्रेय उमाजी जमदाडे (इयत्ता चौथी, माई बाल विद्यामंदिर, इचलकरंजी, कोल्हापूर), तृतीय क्रमांक अंकिता मानसिंग टकले (इयत्ता चौथी, सुधागड प्राथमिक शाळा, कळंबोली), उत्तेजनार्थ क्रमांक तन्वी नंदिप कवडे (इयत्ता पहिली, श्री बालाजी विद्यामंदिर, इचलकरंजी, कोल्हापूर) यांचा आला. पालक मुलं आणि गणेश उत्सव उपक्रम यामध्ये सर्वोत्कृष्ट पालक म्हणून प्रणोती चेतन भदाणे व चेतन भदाणे यांची निवड झाली. प्रमाणपत्र व इतर आकर्षक भेटवस्तू देऊन विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. भारतीय सण उत्सव मुलांपर्यंत योग्य पद्धतीने पोहचावे, मुलांमध्ये गोडी वाढावी म्हणून हा उपक्रम घेतला होता. अशाप्रकारे उपक्रम यशस्वी झाला. या वेळी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष कौन्सिलर पल्लवी निंबाळकर, उपाध्यक्ष ट्रेडर स्वप्नील मुटके, खजिनदार  विशाल कावरे, उप खजिनदार स्वप्नाली खांडेकर सावंत, उप सचिव पत्रकार श्वेता भोईर, सरचिटणीस उद्योजक गौरव शिंदे, पदाधिकारी अनिकेत जगताप, कोमल माने घाडगे, गितांजली सावंत, समीर जाधव, सुदर्शन म्हात्रे आणि बांधिलकी प्रतिष्ठान परिवारातील सर्व सदस्यांनी आनंद व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply