Breaking News

नवी मुंबईतील सीबीडी येथे घरफोडी

घरमालक नाईट ड्युटीला गेल्यावर चोरांनी साधली संधी

Burglary. Skilful professional masked burglar opening a window and holding a torch and breaking into the house

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

चोरटे चोरी करण्यापूर्वी त्या घरात कोण राहते कधी कामाला जातात याचा शोध घेतात. संपूर्ण माहिती गोळा करतात ज्याला पोलिसी भाषेत रेकी म्हणतात. अशाच पद्धतीच्या चोर्‍या सध्या वाढल्या आहेत. बंद घरे फोडून चोरी करण्याचे प्रकार वाढले आहेत. नवी मुंबईतील सीबीडी येथेही असाच एक चोरीचा प्रकार घडला आहे.

तेजपाल सिंग हे सेक्टर 5 सीबीडी येथे वडिलांसोबत राहतात. त्यांचे वडील हे ट्रकचालक असून काही दिवसांपूर्वी आसाम येथे ते माल घेऊन गेले होते. तेजपाल हे एका कंपनीत रात्रीची नोकरी (नाईट ड्युटी) करतात. शुक्रवारी नेहमीप्रमाणे गेट व घराला व्यवस्थित कुलूप लावून ते नोकरीच्या ठिकाणी गेले. दुसर्‍या दिवशी घरी आले त्यावेळी घराचे गेट उघडे दिसले तसेच घराच्या दरवाज्याचे कडी कोयंडा तुटलेल्या अवस्थेत होते. आत गेल्यावर सर्व कपडे समान अस्ताव्यस्त होते. त्यांनी कपाट तपासले असता  सोन्याची साखळी, कर्णफुले, सोन्याचे अंगठी चांदीची नाणी , घड्याळ आणि एक हजाराची रोकड असा 80 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरी झाल्याचे निदर्शनास आले.

विशेष म्हणजे या बाबत फिर्यादी यांनी शेजार्‍यांना विचारणा केली असता त्यांना काहीही माहिती नाही असे उत्तर मिळाले. वास्तविक आपल्या शेजारील घरात रात्री कोणी नाही हे माहिती असताना शेजारधर्म म्हणून सावध राहिले जात नाही, अशी खंत माहिती देताना पोलिसांनी व्यक्त केली.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply