Breaking News

बदलीसाठी लाच घेणारा पोलीस निरीक्षक जाळ्यात

पनवेल, खालापूर : प्रतिनिधी
पोलीस कर्मचार्‍यांची इच्छितस्थळी बदली करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेताना निरीक्षक रामचंद्र नारायण वारे (वय 58) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि. 20) रंगेहाथ अटक केली आहे. वारे हे महामार्ग सुरक्षा पथक पनवेल विभागात कार्यरत होते.
पोलीस निरीक्षक वारे यांनी पोलीस दलातील आपले सहकारी अधिकारी तसेच कर्मचारी यांची इच्छितस्थळी बदली करण्यासाठी दोन कर्मचार्‍यांकडून एक लाख रुपयांची मागणी केली होती. एक लाख रुपये दिल्यानंतर तत्काळ बदली होईल, असे आश्वासन वारे यांनी सहकार्‍यांना दिले होते. त्यानुसार दोन पोलीस कर्मचारी, अधिकार्‍यांनी एक लाख रुपयांची जुळवाजुळव केली होती.
दरम्यान, संबंधित पोलीस अधिकार्‍यांनी याबाबतची माहिती पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली होती. वारे यांनी पोलीस कर्मचारी आणि अधिकार्‍यांना पैसे घेऊन केबिनमध्ये बोलवले होते. त्या वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून वारे यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.
ठाणे पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप, निरीक्षक स्वपन बिश्वास, हवालदार संजय सुतार, अमित चव्हाण, विलास भोये, निशा मांजरेकर, नवनाथ भगत, नाईक दीपक सुमडा, सखाराम दोडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply