पेण : प्रतिनिधी
तालुक्यातील गणपतीवाडी गावातील मुख्य रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन पेणचे आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार रविशेठ पाटील यांच्या आमदार निधीतून पेण तालुक्यात वेगवेगळी विकासकामे केली जात आहेत. गावातील अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा अशा योजना राबवून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावले जात आहेत. ग्रामपंचायत सदस्य अजित साळवी यांच्या पुढाकाराने गणपतीवाडी मुख्यरस्त्याचे काम सुरु होणार असल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, पेण तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, उपाध्यक्ष संतोष आंबेकर, तालुका आयटी सेल अध्यक्ष महेश भिकावले, ग्रामपंचायत सदस्य अजित साळवी, सामाजिक कार्यकर्ते शिरीष मानकवळे, सरपंच ज्योत्स्ना विर, ग्रामपंचायत सदस्या सोनाली बडे, सारिका वाघमारे, सदस्य कपिल म्हात्रे, तसेच उदय मानकवळे, यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला मुख्य रस्ता आता होणार असल्याने ग्रामस्थांच्या चेहर्यावर आनंद पाहायला मिळत आहे.