खोपोली : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ रविवारी (दि. 27) खोपोली येत आहेत, त्या महिला मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 21) सायंकाळी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अश्वीनीताई पाटील यांच्या निवासस्थानी नियोजन बैठक घेण्यात आली. भाजप खोपोली मंडल प्रभारी सुनील घरत यांनी नियोजन बैठकीत मार्गदर्शन केले. या वेळी भाजपचे जिल्हा संघटक अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, खोपोली मंडल सरचिटणीस हेमंत नांदे, प्रमोद पिंगळे यांच्यासह सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.