Breaking News

उरण उपजिल्हा रुग्णालय, मोरा सागरी पोलीस ठाणे इमारतीच्या बांधकामास निधी देणार-ना. रवींद्र चव्हाण

पनवेल : रामप्रहर वृत्त
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले उरण उपजिल्हा रुग्णालय आणि मोरा सागरी पोलीस ठाणे इमारतीच्या बांधकामास निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले असून उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून हा प्रश्न निकाली लागला आहे.
या संदर्भात मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करीत त्यांच्यासोबत सिडको व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक आमदार महेश बालदी यांच्या विनंतीवरून नुकतीच खांदा कॉलनी येथे झाली. या बैठीकीस भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, कार्यकारी अभियंता रूपाली पाटील, उपविभागीय अधिकारी नरेश पवार, मिलिंद कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद वाघमारे, पोर्ट विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर, मोरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अभिजित मोहिते, उरण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. एम. काळेल, शल्य चिकित्सक डॉ. रोकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र इटकरी, नितीन वरकुटे आदी अधिकारी उपस्थित होते.
उरण येथे 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी करण्यासाठी 2018 साली फडणवीस सरकारच्या कार्यकाळात प्रशासकीय मान्यता मिळाली होती. हे काम सीआरएस फंडातून करण्यात होणार येणार होते, मात्र महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सन 2022पर्यंत या कामाला मुहूर्त मिळाला नाही. त्याचबरोबर मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या इमारतीचे बांधकाम हे अंशदान योजनेतंर्गत मंजूर असल्याने या कामास वाढीव निधीची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने या दोन्ही विषयासंदर्भात आमदार महेश बालदी यांनी पाठपुरावा कायम ठेवला. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर या कामाला गती मिळणार असल्याने आमदार महेश बालदी यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिडको आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांना तांत्रिक अडचणी दूर करण्यास सांगून काम तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले आणि या इमारतींच्या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासित केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply