Breaking News

सावरोलीत सर्पदंशाने आदिवासी तरुणाचा मृत्यू

खोपोली : प्रतिनिधी

खालापूर तालुक्यात सावरोली आदिवासी वाडीतील तरुण पातळगंगा नदीवर मासेमारी करण्यासाठी गेला असताना विषारी साप चावल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. 11) घडली. परशुराम कृष्णा पवार असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव असून, सर्पदंश झाल्यानंतर त्याच्यावर गावठी व पारंपरिक विष उतरविण्याचे उपचार करण्यात आले. यादरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याचे समजते. पावसाळ्यात बहुसंख्य आदिवासी बांधव मासेमारीसाठी पातळगंगा नदीपात्रात जातात. बुधवारी सकाळच्या दरम्यान परशुराम पवार हा आदिवासी तरुण मासेमारी करण्यासाठी नदीकडे गेला होता. या वेळी घोणस जातीच्या विषारी सापाने त्याला दंश केला. त्यानंतर घरी आणून त्याच्यावर गावठी  उपचार करण्यात आले. विष उतरविण्यासाठी स्थानिकांनी त्याच्यावर पाणीही मारले, मात्र परशुरामची स्थिती गंभीर बनली व वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला.

Check Also

तळोजा मजकूरमध्ये शिवरायांच्या मंदिराचा वर्धापन दिन

तळोजा : रामप्रहर वृत्ततळोजा मजकूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा पहिला वर्धापन दिन रविवारी …

Leave a Reply