
सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद तांबोळी यांचे अपघाती निधन झाल्यापासून हे पद रिक्त होते. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मुरूड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक पदावर रंगराव पवार यांची नियुक्ती केली. मुरूड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय करडे, सचिव सिराज शेख, माजी अध्यक्ष मेघराज जाधव, उदय खोत, नितीन शेडगे, गणेश चोडणेकर, प्रवासी संघटनेचे तालुका अध्यक्ष श्रीकांत सुर्वे यांनी रंगराव पवार यांचे स्वागत केले.