पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथील श्री म्हसेश्वर मंदिर परिसरात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली साकारण्यात आलेल्या रामबाग या उद्यानाचा लोकार्पण सोहळा आणि सत्यनारायण महापूजा गुरुवारी (दि. 22) आयोजित करण्यात आली आहे. या निमित्ताने सोमवारी न्हावे गाव, न्हावेखाडी आणि मंगळवारी शिवाजीनगर येथे महिला मोर्चा तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत व अन्य मान्यवरांच्या हस्ते महिलांना साड्या तसेच धान्याचे वाटप करण्यात आले. या वाटपावेळी न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच हरेश्वर म्हात्रे, मंदिर कमिटी अध्यक्ष सी. एल. ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य सागर ठाकूर, ज्येष्ठ कार्यकर्ते अरुण ठाकूर, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, मीनाक्षीताई, नंदा पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.