Breaking News

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत रामशेठ ठाकूर विद्यालयाचे सुयश

खारघर : रामप्रहर वृत्त

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर-ओवेपेठ येथील रामशेठ ठाकूर माध्यमिक व  उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन चमकदार कामगिरी करून उज्वल यश संपादन केले. राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, अलिबाग-रायगड व पनवेल महापालिका, पनवेल यांच्या वतीने रविवारी (दि. 18) शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन तालुका क्रीडा संकुल, पनवेल या ठिकाणी करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत रामशेठ ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. या कराटे स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांच्या वजन व वयोगटानुसार घेण्यात आल्या. यामध्ये 14, 17, 19 वर्षाखालील मुले व मुली यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये रामशेठ ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, खारघरमधील विद्यार्थ्यांनी पुढीलप्रमाणे यश संपादन केले. प्रथम क्रमांक मुस्कान संतोष वालिलकर, मिसबा समद बेबल, सतिश राजेंद्र सहानी, कृणाल सतिश भिसे, राज जनार्दन इंगळे, आनंद धोंडू पराते तर द्वितीय क्रमांक आयेशा समिर खान, सानिया शमिम शेख, वेदांत गणेश नवले, रवि विनोद विश्वकर्मा तसेच तृतीय क्रमांक नंदिनी विनोद शर्मा, फातिमा फिरोज शेख या विद्यार्थ्यांचा आला आहे. या कराटे स्पर्धांमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक सहा, द्वितीय क्रमांक चार व तृतीय क्रमांक दोन अशी एकूण 12 बक्षिसे जिंकली आहेत. या विद्यार्थ्यांची मुंबई विभागिय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या चमकदार कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतूक व अभिनंदन करण्यात येत आहे. या भरघोस यशा बद्दल विद्यालयाच्या प्राचार्या निशा नायर  तसेच उच्च माध्यमिक विभागाचे क्रीडा शिक्षक प्रवीण पाटील, व माध्यमिक विभागाचे क्रीडा शिक्षक संभाजी जाधव व अभिजित जोगदंडे यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. या यशाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, सहसचिव भाऊसाहेब थोरात, प्राचार्या निशा नायर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील मुंबई विभागिय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply