कर्जत : प्रतिनिधी
माथेरान शहरातील पोलीस ठाण्याच्या इमारतीचे दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी मंजूर केला होता. त्या निधीमधून पोलीस ठाण्याच्या इमारतीचे दुरुस्ती आणि नूतनीकरण करण्यात आले. नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीचे लोकार्पण आमदार महेंद्र थोरवे यांचे हस्ते झाले. माथेरान शहरात येणारे हजारो पर्यटक यांच्या सुरक्षेसाठी पोलीस ठाणे कार्यरत असून या पोलीस ठाण्याची इमारत ही हेरिटेज प्रॉपर्टी आहे. त्यामुळे नूतनीकरण करताना माथेरान हेरिटेज कमिटी आणि माथेरान सनियंत्रण समितीची परवानगी घेण्यात आली होती.
या दुरुस्ती आणि नूतनीकरण कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 60 लाखाचा निधी मंजूर झाला होता.
माथेरान पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी संजय बांगर यांनी हा निधी खर्च व्हावा आणि पोलीस ठाण्याची इमारत सुसज्ज व्हावी यासाठी प्रयत्न केले होते. त्या निधीमधून सार्वजानिक बांधकाम विभागाने पोलीस ठाण्याच्या इमारतीची दुरुस्ती करून घेतली आणि दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर नूतनीकरण करून घेतले. नुतनीकरण झालेल्या इमारतीचे लोकार्पण कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रशासक सुरेखा भणगे, महसूल अधीक्षक दीक्षांत देशपांडे, सहायक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे, चंद्रकांत चौधरी आदी उपस्थित होते.
Check Also
आमदार महेश बालदी यांचा विविध वाड्यांमध्ये प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा प्रचार सभा प्रमुख प्रवीण काळबागे, माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत …