खारघर : रामप्रहर वृत्त
खारघर राजस्थानी समाजच्या वतीने दिपावली स्नेह मिलन आणि विशाल भजन संध्या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांना राजस्थानी समाज बांधवांनी आपले समर्थन देत जाहीर पाठिंबा दिला. जे आपल्या हिंदुत्वाचे संरक्षण करणारे आहेत, जे आपल्या सुखा दुःखात सोबत राहतात आणि सर्व समाजाला न्याय मिळवू देण्यासाठी कटीबद्ध असतात अश्या आमदार प्रशांत ठाकूर यांनाच आपल्याला विधानसभा निवडणुकीत विजयी करायच आहे हा निर्धार या वेळी समाज बांधवांनी व्यक्त केला.
पनवेल विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना विविध संस्था, समाज आणि संघटनांचा दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे. त्यानुसार खारघरमध्ये झालेल्या राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात सिरवी समाज, राजपुरोहीत समाज, सेनी समाज, बिष्णोई समाज, जैन समाज, पटेल समाज, देवासी समाज आणि जाट समाजाने आपले समर्थन देत पाठिंबा दिला.
या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा चिटणीस ब्र्रिजेश पटेल, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक राजू शर्मा, विजय पाटील, राष्ट्रवादीचे शिवदास कांबळे, रघुनाथ सिंग, राजेश अग्रवाल, सिरवी समाजाचे हरिष चौधरी, राजपुरोहीत समाजाचे रघुनाथ सिंह, सेनी समाजाचे बनवारी लालजी, बिष्णोई समाजाचे मनोहरजी, महाविरजी, पटेल समाजाचे जीवा रामजी, देवासी समाजाचे महेंद्रजी, जाट समाजाचे किसनजी, काळुरामजी यांच्यासह समाजा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper