Breaking News

कोलिवली येथील सटुआईच्या यात्रेचा ट्रेंड बदललाय!

कर्जत : प्रतिनिधी
कर्जत तालुक्यात कोलिवली गावी वसलेल्या सटुआईची पौष महिन्याचे पहिल्या दिवशी यात्रा भरत असते. वर्षनुवर्षे यात्रा एक दिवस मोठ्या गर्दीत व्हायची. मात्र एकाच दिवशी होणारी गर्दी पाहून भाविकांनी यात्रेत पौष पौर्णिमापर्यंत येण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे आता तर यात्रेचा ट्रेंड बदलला आहे. आता आठवड्यातील चार दिवस भक्त आपल्या बाळाला घेऊन नवस फेडण्यासाठी येत आहेत. दुसरीकड़े या नव्या बदललेल्या ट्रेंडमुळे कोलिवली परिसरात भाविकांची गर्दी असते आणि त्यामुळे तेथील व्यापार उद्योग भरभराटीला आला आहे.
कर्जत तालुक्यातील नेरळ जवळ असलेल्या कोलिवली गावात सटुआईचे मंदिर आहे. त्या मंदिरात दरवर्षी पौष महिन्याचे पहिल्या दिवशी यात्रा भरते. आपल्या बाळाच्या जणांचे भविष्य सटुआई लिहिते तसेच आपल्या बाळाचे भविष्य उज्ज्वल व्हावे आणि अपत्य व्हावे म्हणून देखील विवाहित दाम्पत्य नवस करीत असतात. ते नवस फेडण्यासाठी भक्त यात्रेत मोठ्या संख्यने येत असतात. रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील भाविकांची पौष पौर्णिमेपर्यंत चालणार्‍या या यात्रेत गर्दी करीत असते. कर्जत तालुक्यातील नेरळजवळील भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी निसर्गरम्य वातावरणात असलेले जागृत देवस्थान म्हणजेच कोलीवली गावची सटूआई. मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकापासून अवघ्या तीन किलोमीटरच्या अंतरावर कोलीवली गाव असून येथे सटूआईचे जागृत देवस्थान आहे. याठिकाणी दर्शनासाठी भाविकांची सतत वर्दळ असते. सटूआई नवसाला पावत असल्याने नवस फेडण्यासाठी भक्तगण अनेक जिल्ह्यातून ठिकाणी अवर्जून येत असतात.
26 डिसेंबर रोजी मुख्य यात्रा पार पडली असून 6 जानेवारी रोजी पौर्णिमा आहे. ते लक्षात घेऊन कोलिवली येथे देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांनी नियोजन केल्याचे दिसून येत आहेत. मुख्य यात्रेनंतर त्यानंतर येणार्‍या मंगळावर,बुधवार,शुक्रवार आणि रविवार अशा चार दिवशी भाविकांनी गर्दी केलेली दिसून येत आहे. त्यामुळे हि यात्रा पौर्णिमा सुरु होईपर्यंत 6 जानेवारी पर्यंत सुरूच राहणार असे स्पष्ट होत आहे. देवीच्या यात्रेच्या मुख्य दिवशी किमान दहा हजार भाविकांची गर्दी होती. त्यादिवशी नेरळ पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थ यांचे नियंत्रण असते. मात्र आता आठवड्यातून चार दिवस येणार्‍या भाविकांवर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण दिसून येत नाही. त्यामुळे नेरळ कशेळे रस्त्याच्या कडेला वाहने उभी करून ठेवणे आणि डीजे चालवून नाचगाणे असे प्रकार सुरु असून त्यांच्यावर आळा घालणे सध्या तरी कोणाच्या हातात असल्याचे दिसून येत नाही. भाविकांनी मुख्य यात्रेनंतर देवीच्या दर्शनासाठी केलेली गर्दी लक्षात घेऊन अनेक दुकानदार यांनी आपली दुकाने कायम ठेवली आहेत. त्यात प्रामुख्याने लहान मुलांच्या खेळण्याची साहित्य आणि मिठाई यांची दुकाने तसेच झोपाळे आणि मनोरंजाची साहित्य अशी बाजारपेठ कोलिवली गावाच्या वेशीवर कायम आहे.

व्यापार उद्योग वाढलाय
कोलिवली येथे येणारे भाविक यांच्या गर्दीमुळे नेरळ पासून वाकस गावापर्यंत सर्व ठिकाणी दुकानांमध्ये खरेदी वाढलेली दिसून येते. तेथे येणारे भाविक साहित्याची खरेदी करीत असल्याने त्या वस्तूंना बाजारपेठ मिळाली आहे. त्यात मटण आणि चिकन यांची मोठी विक्री त्या भागात होताना दिसत आहे. आठवड्यातील मंगळावर, बुधवार, शुक्रवार आणि रविवार या चार दिवस भक्तांनी केलेल्या गर्दीमुळे येथील स्थानिक समाधानी आहे.
सुरक्षेचे काय?
यात्रेत आलेलं भाविक यात मद्यपान करणारे भाविक देखील असल्याचे दिसून येत आहेत. मद्यपान केल्यानंतर बोलण्याबोलण्यात हमारी – तुमरी वर भाविक जात असतात. त्यात त्यांनी आणलेली वाहने हि रस्त्याच्या आजूबाजूला उभी केलेली असतात आणि त्यामुले या रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी होत असून त्यावर नियंत्रण कोणी ठेवायचे? असा प्रश्न समोर येत आहे. यात्रेच्या दिवशी भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आता अन्य दिवशी ग्रामस्थ तसेच पोलीस प्रशासन सतत बंदोबस्त देऊ शकत नाही. हे लक्षात घेऊन कोलिवली गाव आणि परिसरात सुरक्षेचे कारण पुढे येत आहे.

Check Also

आमदार महेश बालदी यांचा विविध वाड्यांमध्ये प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा प्रचार सभा प्रमुख प्रवीण काळबागे, माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत …

Leave a Reply