पनवेल : रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा प्रचार सभा प्रमुख प्रवीण काळबागे, माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत व सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत यांनी उरण मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार महेश बालदी यांच्या विजयासाठी विविध वाड्यांमध्ये जाऊन प्रचार केला. या वेळी कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
प्रचारासाठी मोदीमाल वाडी, तुळशीमाळ वाडी, सवणे आदिवासी वाडी, गायचरण वाडी, खुटल वाडी, जांभीवली वाडी, पेरूची वाडी, कालीवली वाडी, कल्हे विठ्ठल वाडी, लहुची वाडी, ब्राम्हण डूगी वाडी, आखाडा वाडी, खैराट वाडी, बानुबाई वाडी, आपटा दाभोळवाडी, रामवाडी, तलापाळी वाडी, गंगेचीवाडी या ठिकाणी संवाद फेरी आयोजित करण्यात आली होती.
Check Also
सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …