‘टीआयपीएल’तर्फे हेल्मेटचे वाटप

पाडेघरमध्ये रस्ता सुरक्षासंदर्भातही मार्गदर्शन

पनवेल : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत गव्हाण फाटा वाहतूक शाखा व ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. (टीआयपीएल) एचआर विभाग पाडेघरच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. 16) पाडेघर येथे दुचाकी, चारचाकी वाहनचालक कर्मचार्‍यांना रस्ता सुरक्षेसंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. त्या वेळी माहिती पुस्तिकेचे व सहा दुचाकी चालकांना हेल्मेटचे विनामूल्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला गव्हाण फाटा वाहतूक शाखेतर्फे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुलाणी, पालीस नाईक मस्के, पोलीस शिपाई शिंदे आणि कंपनी कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि.च्या वतीने नेहमीच सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply