खारघर ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात रविवारी (दि. 7) पॅरेंट स्पोर्ट्स मीटचे आयोजन करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद लाभला.
स्पोर्ट्स मीटचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी स्कूल कमिटी मेंबर प्रभाकर जोशी, भाजप पनवेल उत्तर मंडळ सचिव जयदास तेलवणे, प्रभाग 3 महिला अध्यक्ष लहा मॅडम, हभप मनोहर कडू, इसीपीटीएच्या व्हाइस चेअरमन श्रद्धा तेलवणे, प्राचार्य निशा नायर आदी उपस्थित होते.
उत्साह, आनंद आणि खेळभावनेने भरलेला पॅरेंट स्पोर्ट्स मीट उत्साहात पार पडला. या वेळी पालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून विविध खेळांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्व पालकांचे अभिनंदन केले. त्यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. क्रीडा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
Check Also
वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper