पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नैना प्राधिकरण संबंधितांच्या सर्व समस्या सोडविणार असल्याची ग्वाही ऑल इंडिया रियल इस्टेट असोसिएशन सोबतच्या नियोजित बैठकीत दिली. रविवारी (दि. 15) नियोजित ठरल्याप्रमाणे ऑल इंडिया रियल इस्टेट असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR) नैना प्राधिकरण क्षेत्रात अंमलात आणण्याबाबत बैठक घेतली. या वेळी ठोस निर्णायक शासनाकडून आदेश देण्यात यावेत आणि नैना प्राधिकरणाकडून नियोजनाबाबत काही त्रुटी आहेत, त्या कशाप्रकारे दुर करता येतील याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR) बाबतीत स्वतः पत्र पाठवून संबंधित विभागाचे मंत्री आणि संबंधित प्रमुख अथवा संचालकांना कळविण्यात आलेले आहे. नैना प्राधिकरण क्षेत्रातील विकास अथवा बांधकाम करण्यास येणार्या बांधकाम व्यावसायिक तसेच नैना क्षेत्रातील विकासावर आधारीत सर्वेच क्षेत्रातील कर्मचारी वर्ग अथवा बांधकाम मटेरियल सप्लायर अथवा कामगार यांच्यासह अन्य सर्वांच्या समस्यांबाबत लवकरात लवकर निवारण करू, अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांनी आजच्या चर्चेतून दिली आहे. ही चर्चा घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील ऑल इंडिया रियल इस्टेट असोसिएशनचे सेक्रेटरी अजीत दशरथ रोकडे, महेश गोगांवकर, प्रदीप भोपी, महा इस्टेट रायझिंग असोसिएशन सरचिटणीस राकेश सर्वे, दर्शन सिंग, अरविंद विश्वकर्मा, कारभारी, उमेश पटेल तसेच पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक तेजस कांडपिळे आदी सहभागी होऊन होते.