पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल शहरामध्ये एका पिसाळलेल्या श्वानाने दहशत पसरवली आहे. या श्वानाने दोन दिवसांत अनेक नागरिकांना चावा घेतला आहे. महापालिकेचे पथक या श्वानाचा शोध घेत आहेत. पनवेल शहरामध्ये सोमवारी लाईन आळी परिसरात तसेच टपाल नाका परिसरातील युनियन हॉटेल येथे अनेक नागरिकांना पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतला. तर मंगळवारी (दि. 21) पनवेल शहरातील भारत गॅस येथील परिसरात चार नागरिकांना याच पिसाळलेल्या श्वानाने दंश केला. तसेच सकाळीही अनेकांना या श्वानाने चावा घेतला. या प्रकाराबाबत माजी नगरसेविका दर्शना भोईर यांनी तत्परतेने दखल घेत महापालिकेला कळविले. त्यानुसार अरुण कांबळे व शैलेश गायकवाड यांनी महापालिका पथकाला या पिसाळलेल्या श्वानाच्या शोधात पाठविले आहे. हे पथक पिसाळलेल्या श्वानाचा शोध घेत आहे. दरम्यान, दंश झालेल्या नागरिकांची दर्शना भोईर यांनी दवाखान्यामध्ये जाऊन चौकशी केली
Check Also
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …