नवी दिल्ली ः गेल्या काही महिन्यांपासून चीनकडून भारतीय सीमेवर सातत्याने आगळीक केली जात असून, घुसखोरी करण्याचेही प्रयत्न झाले आहेत. भारताने चीनला चोख प्रत्युत्तर दिले असले तरी सीमेवरील तणाव कायम आहे. या पार्श्वभूमीवर उभय देशांच्या लष्करी अधिकार्यांमध्ये चर्चेच्या फेर्या सुरू आहेत, मात्र त्यातून काहीही तोडगा निघत नाही. चीनच्या विश्वासघातकीपणाचा अनुभव असल्याने भारतीय लष्कराने सर्व तयारी सुरू केली आहे. युद्धाचा प्रसंग आलाच तर लष्कर आणि हवाई दल एकाच वेळी आघाडी सांभाळणार असून, कशा प्रकारे सामना करायचा याचा अॅक्शन प्लान तयार झाल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली. सैन्याने आघाड्या कशा सांभाळायच्या, शस्त्र आणि दारूगोळा यांचा पुरवठा आणि इतर गोष्टींची सज्जता पूर्ण झालेली आहे. विशेष म्हणजे नवी शस्त्रास्त्रेही दिमतीला आहेत.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper